Sunday, August 04, 2024 04:12:43 AM

वरळी हिट अँड रन प्रकरणात नेमकं काय घडलं ?
वरळी हिट अँड रन प्रकरणात नेमकं काय घडलं ?

पुण्यातील पोर्शे कर अपघातानंतर अनेक प्रकरणं समोर आली असून आता पुन्हा एकदा वरळी हिट अँड रन प्रकरण घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती जखमी झाला आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणात नेमकं काय घडलं  
वरळी हिट अँड रन प्रकरणात नेमकं काय घडलं ? 

मुंबई, प्रतिनिधी, दि. १० जुलै २०२४ : वरळीचे हिट अँड रन प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात वाहन बेदरकारपणे चालवून अपघात करणे आणि फरार होणे या दोन गंभीर आरोपात मिहीर शाह याला पोलिसांनी शहापूरमधील एका रिसॉर्टमधून अटक केले. मिहीरला शिवडी येथे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. 

वरळीत मुख्य आरोपी मिहीर चालवत असलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. या अपघातात कावेरी नाखवा (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती प्रदीप जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरुन फरार झालेल्या मिहीरला मुंबई पोलिसांनी अटक केले. घटनेला दोन दिवसांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतर अटकेची कारवाई झाली. मिहीर शाह याची आई आणि दोन बहि‍णींना तसेच त्याला मदत करणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी अटक केले आहे. मिहीरला मदत केल्याचा आरोप त्याच्या वडिलांवर होत होता. पण मिहीरच्या वडिलांची जामिनावर सुटका झाली आहे. 

पोलिसांच्या हाती आलेल्या सीसीटीव्ही फूटेजनुसार मिहीर अपघाताआधी मर्सिडिज कारमध्ये बसला होता मात्र अपघात बीएमडब्ल्यू कारद्वारे झाला आहे. मिहीरने कार कुठे आणि का बदलली हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. पोलिसांनी तपासाकरिता मिहीरच्या वाहनाचा चालक राजेंद्रसिंग बिडावत यालाही ताब्यात घेतले आहे. बिडावतची चौकशी सुरू आहे.

वरळीत नक्की काय घडलं? 

१. रविवार, ७ जुलै २०२४च्या पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी नाखवा दाम्पत्य प्रवास करत होते. 
२. माझगाव बंदरातून मासे घेऊन नाखवा दाम्पत्य घरी निघाले होते. 
३. नाखवा दाम्पत्याला नेहरू तारांगण समोरच्या बस स्टॉपजवळ मागून येणाऱ्या चारचाकीने ठोकरले. 
४. अपघातातील वाहन बीएमडब्ल्यू होते. 
५. अपघातानंतर बीएमडब्ल्यू न थांबवता पुढे गेली. 
६. बीएमडब्ल्यूसोबत कावेरी नाखवा वाहनाच्या सोबत फरफटत गेल्या. 
७. घटनास्थळापासून काही अंतरावर कावेरी यांचा मृतदेह सापडला. 
८. अपघातानंतर मिहीर सी-लिंक मार्गे गोरेगावला पोहचला. 
९. गोरेगाव इथून निघून मिहीर विरारच्या एका रिसॉर्टमध्ये लपला. 


सम्बन्धित सामग्री